Sangli News

आज दिनांक 10 जून 2020 रोजी श्रीमती मीना मारू अध्यक्ष, जीवन ज्योत कॅन्सर रीलिफ केअर ट्रस्ट मुंबई ब्रच सांगली व माननीय श्री नितीन कापडणीस साहेब आयुक्त सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका यांनी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली या रुग्णालयातील covid-19 बाधित व संशयित रुग्णांच्या वर अतिदक्षता विभागामध्ये उपचार करणे करता अत्यावश्यक असलेले व्हेंटिलेटर तसेच सॅनिटायझर स्टॅन्ड फेस शील्ड व कापडी मास्क इत्यादी साहित्य देणगी स्वरुपात भेट म्हणून दिले यावेळी संपन्न झालेल्या कार्यक्रमास अधिष्ठाता डॉक्टर सुधीर ननंदकर उप अधिष्ठाता डॉक्टर गुरव, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भोई, उप अधीक्षक डॉक्टर दळवी ,डॉक्टर मिरगुंडे, प्रशासकीय अधिकारी श्री दाभाडे, अभिसेविका श्रीमती चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते.